कंगनाने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग विश्वात पदार्पण केलं. ‘गँगस्टर’ या पहिल्याच चित्रपटात तिने दमदार अभिनयाने आपली वेगळी छाप सोडली. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून कंगनाने सिद्ध केलं की ती इंडस्ट्रीत काहीतरी वेगळं करण्यासाठी आली आहे.
उदयपूर : बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त कंगनाने उदयपूरमधील श्रीनाथजींचं दर्शन घेतलं. यावेळी मनसेचे ‘मसल मॅन’ मनीष धुरी हेसुद्धा तिच्यासोबत होते. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचे कुटुंबीय, गुरू आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. याचसोबत तिने अशा लोकांचेही आभार मानले आहेत, जे तिला ट्रोल करतात.