या ब्लॉगमध्ये बिग बींनी पुन्हा पहिल्याप्रमाणे काम करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. ‘काम हेच नित्यक्रमाचं सार असावं आणि दिनचर्येचा जीवन जगण्यावर प्रभाव असावा. यापैकी एक जरी गोष्ट नसली तरी आपलं वैयक्तिक जग कोलमडतं,’ असं त्यांनी लिहिलं.

Amitabh Bachchan
Image Credit source: Tv9
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली. त्यांच्या बरगड्यांना जबर मार लागला. उपचारानंतर ते गेल्या काही दिवसांपासून घरीच आराम करत आहेत. एकीकडे दुखापतीचं दुखणं झेलत असताना आता बिग बींना दुसरा त्रास जाणवत आहे. याबाबतची माहिती त्यांनी खुद्दा ब्लॉगद्वारे दिली. असह्य वेदनांमुळे अखेर मध्यरात्री त्यांना डॉक्टरांना घरी बोलावलं लागलं, असंही त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.