याच कारणामुळे तुटले सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे नाते? अनेक वर्षांनंतर सत्य आले समोर – Amrita Singh and Saif Ali Khan divorced due to this reason

मनोरंजन


सैफ अली खान हा कायमच चर्चेत राहतो. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान हा कुटुंबासोबत स्पाॅट झाला होता. नुकताच विदेशात सुट्ट्या घालवण्यासाठी सैफ अली खान हा कुटुंबासोबत गेला, ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मुंबई : बाॅलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खान (Saif Ali Khan) हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान हा सध्या त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड आनंदी आहे. त्याच्या या आनंदाचे कारण म्हणजे करीना कपूर (Kareena Kapoor), तैमूर अली खान आणि जेह अली खान हे आहेत. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान हा त्याच्या कुटुंबियांसोबत आफ्रिकेमध्ये फिरायला गेला होता. करीना कपूर हिने तैमूर, जेह आणि सैफ अली खान यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सैफ अली खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही सैफ अली खान हा प्रचंड सक्रिय आहे.

सैफ अली खान याने आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार बघितले आहेत. आपल्यापेक्षा वयाने तब्बल 15 वर्ष मोठ्या असलेल्या अमृता सिंह हिच्यासोबत सैफ अली खान याने लग्न केले होते. या लग्नाकडे सर्वांचाच नजरा होत्या. विशेष म्हणजे अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचे नाते तब्बल 12 वर्ष टिकले.

2004 मध्ये अचानकच बातम्या आल्या की, सैफ अली खान आणि अमृता सिंह हे लवकरच विभक्त होणार आहेत. यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र, अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी कधीच त्यांच्या घटस्फोटाचे कारण जाहिर केले नाही. दोघांनीही यावर बोलणे टाळले. मात्र, 2005 साली सैफ अली खान याने एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्याने काही मोठे खुलासे केले.

या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच सैफ अली खान हा अमृता सिंह हिच्यासोबत झालेल्या घटस्फोटावर बोलताना दिसला. सैफ अली खान म्हणाला की, कायमच अमृता सिंह ही नाकाबिल म्हणायची. इतकेच नाहीतर असे सांगितले जाते की, अमृता सिंह नेहमीच सैफ अली खान याच्या आईचा आणि बहिणीचा अपमान करायची.

सैफ अली खान असेही म्हणताना दिसला की, घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंहने त्याला 5 कोटींची मागणी केली. सैफ अली खान याने अमृता सिंह हिला जवळपास 3 कोटी दिले असल्याचा दावा देखील सैफ अली खान हा करताना दिसला. मुलगा इब्राहिम हा 18 वर्षांचा झाला नव्हता तेंव्हाही सैफ अली खान हा मुलाला दर महिन्याला 1 लाख रूपये देत असे.

या मुलाखतीमध्ये सैफ अली खान म्हणताना दिसतोय की, मी शाहरूख खान याच्या एवढे नक्कीच कमवत नाहीये. पण मी माझ्या मुलांसाठी शेवटपर्यंत काम करेल आणि त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करेल. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करीना कपूर हिने सांगितले की, सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतल्यानंतर जवळचे लोक तिला सैफ अली खान याच्यासोबत लग्न न करण्याचा सल्ला देत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *