करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून आलिया भट्टला लाँच केलं होतं. त्यानंतर तिने ‘हायवे’, ‘टू स्टेट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘राजी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Aishwarya Rai and Alia Bhatt
Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरून नेहमीच चर्चा होते. अनेकदा ही चर्चा इतकी वाढते की त्यावरून वाद निर्माण होतात. फिल्म इंडस्ट्रीत आणि सर्वसामान्यांमध्ये ही बाब जगजाहीर आहे की कलाकारांच्या मुलांना म्हणजेच स्टार किड्सना सहज संधी मिळतात. याउलट ज्यांचा कोणी गॉडफादर नसतो, त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. अशाच गोष्टीवरून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही खदखद व्यक्त केली होती. तेसुद्धा अभिनेत्री आलिया भट्टबद्दल. आलियाला करिअरच्या सुरुवातीपासूनच करण जोहरने खूप पाठिंबा दिला आणि त्यामुळे चांगल्या संधी थेट तिच्या पदरात पडतात, असं ऐश्वर्या म्हणाली होती.