जितना मौत के करीब जा रहा हूं, उतना… बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला मृत्यू का सतावतोय? – This Bollywood actor made a shocking statement about death

मनोरंजन


सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बाॅलिवूड विश्वावर शोककळा पसरली. बाॅलिवूडच्या कलाकारांनी पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. आता बाॅलिवूडच्या एका कलाकारांना मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, नाटककार, संगीतकार पियुष मिश्रा (Piyush Mishra) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या कवितांनी आणि गाण्यांनी त्यांनी तरूण पिढीला देखील आकर्षित केले आहे. पियुष मिश्रा यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. काही चाहते तर पियुष मिश्रा यांना देव मानतात. पियुष मिश्रा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास एका पुस्तकामध्ये सांगून टाकलाय. या पुस्तकात त्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील फक्त चांगलाच गोष्टी नाहीतर त्यांनी काय चुका केल्या, त्यांना कुठल्या वाईट गोष्टींच्या सवयी लागल्या हे सर्व सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या पुस्तकामुळे पियुष मिश्रा चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्यांनी काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. पियुष यांनी आपले आत्मचरित्र ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ हे त्यांना देव मानणाऱ्या तरुणांना समर्पित केले आहे. यामध्ये काही मोठे खुलासे देखील केले.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पियुष मिश्रा यांनी म्हटले आहे की, मी माझे पुस्तक हे त्या तरुणांना समर्पित करतो जे मला सज्जन मानतात. माझ्या आयुष्यातील कटू सत्येसमोर यावीत आणि मी सुद्धा एक साधा माणूस आहे हे त्यांना समजावे अशी माझी इच्छा होती. माझ्या सर्व चुका, व्यसने मी पुस्तकामध्ये लिहिली आहेत.

पुढे पियुष मिश्रा म्हणाले की, हे सर्व मी पुस्तकामध्ये लिहिण्याचे मुख्य कारण हे आहे की, जे तरुण मला देत मानतात त्यांना जेणेकरून समजेल की मी माणूस आहे आणि माझ्याकडूनही अनेकदा चुका झालेला आहेत आणि होतात देखील. यावेळी पियुष मिश्रा यांना विचारण्यात आले की, अशी तुमची कोणती इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची राहून गेलीये आणि ती तुम्हाला आता पूर्ण करायची आहे.

यावर पियुष मिश्रा म्हणाले की, आता अशी कोणतीही इच्छा राहिलेली नाहीये…आता मला माहिती नाहीये की, मला पुढे काय करायचे आहे. मी आता अभिनयाकडे लक्ष देत आहे. हा मला चित्रपटाचे डायरेक्शन करायचे आहे पण यासाठी खूप जास्त तयारी हवी, ही खूप मोठी जबाबदारी असते. मला यासाठी उठायची इच्छा नाहीये. पुढे पियुष मिश्रा म्हणाले, वैराग्य हळूहळू येत आहे. आता कोणतेही काम करण्याची इच्छा मनात राहिली नाहीये. मृत्यू सतत सतावत आहे.

जसजसा मी मृत्यूच्या जवळ जातोय तसतशी माझी काम करण्याची इच्छाशक्ती देखील कमी होत आहे. पुढे पियुष मिश्रा म्हणाले, हे बघा काम करण्याची मर्यादा असते, किती दिवस काम करायचे. किती दिवस ही स्पर्धा करत राहणार? तुम्हालाही थकवा जाणवतो. म्हणूनच हळूहळू मरणाच्या वाटेला जाण्यासाठी मी हेच काम करत आहे. आता पियुष मिश्रा यांचे हे बोलणे ऐकून चाहते तणावात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *