अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खूप वाईट बातमी आहे. एका अॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान अनपेक्षित प्रकार घडला आहे. अक्षय कुमार टायगर श्रॉफ याच्यासोबत चित्रीकरण करत असताना अपघात घडलाय.

Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अक्षय कुमार आगामी चित्रपटाच्या अॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्यामुळे तो त्याने ठरवल्यानुसार पोषक आहार खातो. रात्री लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. त्याच्या या जीवनशैलीचं नेहमी कौतुक होत असतं. त्याची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो चित्रपटामध्ये अॅक्शन सीनच्या शूटींग दरम्यान स्वत: स्टंट करतो. यासाठी तो कुणाचीही मदत घेत नाही. पण त्याचा हाच आत्मविश्वास त्याच्यासाठी घातक ठरला आहे. कारण एका चित्रपटाच्या शूटींग दरम्यान अपघाताची घटना घडलीय.