एरिकाला ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून ओळख मिळाली. यामध्ये तिने शाहीर शेखसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.

Erica Fernandes
Image Credit source: Instagram
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारणारी प्रसिद्धा टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. एरिका भारत सोडून दुबई स्थायिक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती तिथेच राहतेय. फक्त कामानिमित्त ती भारतात ये-जा करतेय. भारत सोडण्यामागचं कारण सांगताना एरिका असंही म्हणाली की दुबईहून मुंबईला पोहोचणं हे गोरेगावहून नायगावला पोहचण्यापेक्षा अधिक सोपं आणि जलद आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.