एमसी स्टॅन, अब्दु रोझिक, साजिद खान, शिव ठाकरे, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर आहलुवालिया यांची मंडली होती. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये अब्दुने एमसी स्टॅनच्या आईसोबत फोटो न काढल्यामुळे दोघांमधील शीतयुद्ध सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.

Abdu Rozik and MC Stan
Image Credit source: Instagram
मुंबई : ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि बिग बॉस 16 चा माजी स्पर्धक अब्दु रोझिक याचं गेल्या काही दिवसांपासून रॅपर एमसी स्टॅनसोबत वाद सुरू आहे. बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅनसोबतची मैत्री संपली, असं वक्तव्य त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं होतं. एमसी स्टॅन माझे फोन उचलत नाहीये, अशी तक्रार त्याने माध्यमांसमोर केली होती. मात्र या दोघांमध्ये नेमका काय वाद आहे, याविषयी स्पष्ट माहिती कोणालाच नव्हती. आता अब्दुने थेट सोशल मीडिया अकाऊंटविरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. याविषयी त्याच्या टीमकडून ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहिण्यात आली आहे.