अखेर जान्हवी हिचे स्वप्न पूर्ण, ज्युनियर एनटीआरसोबत बोनी कपूरची लेक करणार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका – Junior NTR and Janhvi Kapoor’s film shooting has started

मनोरंजन


जान्हवी कपूर हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखती दिलीये. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिने मोठा खुलासा केला. जान्हवी कपूर ही आता साऊथच्या चित्रपटामध्ये डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे यासोबतच जान्हवी कपूर हिचे एक मोठे स्वप्न देखील पूर्ण होत आहे.

मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ती लवकरच साऊथ चित्रपटामध्ये डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूर म्हणाली की, माझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होत आहेत. यासाठी मी देवाकडे खूप जास्त प्रार्थना केल्या. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) सोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते आणि आता हे पूर्ण होत आहे. मी आता सध्या फक्त आणि फक्त दिवस मोजत आहे. मी ज्यूनिअर एनटीआरसोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे.

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे मिली चित्रपटाची निर्मिती ही जान्हवी कपूर हिची वडील बोनी कपूर यांनीच केली. जान्हवी कपूर हिने मिली चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही केले. मात्र, तरीही हा चित्रपट फ्लाॅप गेला.

जान्हवी कपूर हिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा हिचा डबल एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला होता. तर कतरिना कैफ हिचा फोन भूत हा रिलीज झाला होता. मात्र, हे तिन्ही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसले. जान्हवी कपूर हिच्या मिली या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या, मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

नुकताच जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी कपूर ही हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिने जाहिर केले होते की, ती एनटीआर 30 चित्रपटात ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करणार आहे. ज्युनियर एनटीआरसोबत काम करणे आपले स्वप्न असल्याचे देखील जान्हवी हिने म्हटले होते.

आता जान्हवी कपूर हिने एनटीआर 30 या चित्रपटाची शूटिंग सुरू केलीये. याचेच फोटो जान्हवी कपूर हिने शेअर केले. फोटो शेअर करताना जान्हवी कपूर हिने लिहिले की, शुभ दिवस, सर्वात खास प्रवासाची सुरुवात #NTR30…आता जान्हवी कपूर हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. चाहते आता जान्हवी कपूर हिच्या या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *