गेल्या काही दिवसांपासून मंडलीतील सदस्य एकत्र दिसत नव्हते. या मंडलीत साजिद खान, अब्दु रोझिक, निमृत कौर आहलुवालिया, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल तौकिर खान यांचा समावेश होता.

Shiv Thakare and MC Stan
Image Credit source: Instagram
मुंबई : ‘बिग बॉस 16’मध्ये बनलेल्या मंडलीमध्ये आता फूट पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंडलीमधील अब्दु रोझिक आणि एमसी स्टॅन यांच्यात काही वाद सुरू असल्याचं पहायला मिळतंय. या दोघांमध्ये एका गाण्यावरून वाद सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अब्दु रोझिकने हजेरी लावली होती. यावेळी त्याला मंडलीबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘मंडली खत्म’. त्याच्या या वक्तव्यानंतर बिग बॉसच्या घरात लोकप्रिय झालेली मंडली आता एकत्र राहिलेली नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मंडलीचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या शिव ठाकरेनं आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.