Shah Rukh Khan स्टारर ‘पठाण’ सिनेमा उद्यापासून घर बसल्या येणार पाहता – shahrukh khan and deepika padukone starrer pathaan now release on amazon prime

मनोरंजन


Pathaan सिनेमातील ‘हे’ सीन देखील घर बसल्या उद्यापासून तुम्ही पाहू शकता; जाणून घ्या शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा कुठे आणि कसा येणार पाहता…

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) स्टारर ‘पठाण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. पठाण सिनेमा २५ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने बॉक्सऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. आज दोन महिन्यांनंतर देखील पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर कायम आहे. आता दोन महिन्यांनंतर प्रेक्षकांना घर बसल्या पठाण सिनेमा पहाता येणार आहे. किंग खान याचा ‘पठाण’ सिनेमा बुधवारी म्हणजे २२ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. म्हणून ज्या प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला नाही किंवा ज्यांना पुन्हा पाहायचा आहे, त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला पठाण सिनेमा २२ मार्च रोजी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमातून जे सीन डिलीट करण्यात आले होते, ते सीन देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सर बोर्डाने सिनेमातून काही सीन वगळण्यास सांगितले होते.

आता पठाण सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्यामु्ळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पठाण मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला जमा केला. भारतात सिनेमाने ६५० कोटीं पेक्षा जास्त कमाई केली, तर परदेशाचत सिनेमाने १००० कोटींपेक्षा जास्त मजल मारली.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर अनेक रेकॉर्ड मोडले. (pathan box office collection)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *