Satish Kaushik यांच्या निधनानंतर लेकीने घेतला मोठा निर्णय; वंशिका आईसोबत सुरु करणार ‘हे’ काम – Satish Kaushik daughter vanshika kaushik start new instagram account

मनोरंजन


Satish Kaushik यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर, कौशिक यांच्या लेकीने आईच्या मदतीने पुन्हा सुरु केलं ‘हे’ काम

Satish Kaushik यांच्या निधनानंतर लेकीने घेतला मोठा निर्णय; वंशिका आईसोबत सुरु करणार 'हे' काम

सतीश कौशिक आणि त्यांचे कुटुंबीय

मुंबई : आपल्या अभिनयाने सर्वांना पोट धरुन हसवणारे अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक आता मात्र चाहत्यांना रडवून दुसऱ्या विश्वात गेले आहेत. सतीश कौशिक यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका कौशिक यांना सोडून गेले आहेत. वडिलांच्या निधनानंतर सतीश यांची लेक वंशिका हिला मोठा धक्का बसला. वडिलांच्या निधनानंतर वंशिका कोणासोबत बोलत देखील नव्हती असं अनेकदा सांगण्यात आलं. वडिलांच्या निधनानंतर आता वंशिकाने मोठा निर्णय घेतला आहे. वंशिका आईच्या मदतीने एक नवीन गोष्ट सुरु करणार आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर वंशिकाने तिचा इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केला होता. पण आता वंशिकाने पुन्हा नवीन इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केला आहे. वंशिका फक्त १० वर्षांची असल्यामुळे तिच्या अंकाऊटची जबाबदारी सतीश कौशिक यांच्या खांद्यावर होती. आता वंशिका हिच्या अंकाऊटची जबाबदारी आई शीशी कौशिक यांच्या खांद्यावर असणार आहे.

याबद्दल सतीश कौशिक यांचे मॅनेजर म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही १३ वर्षांचे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला अकाउंट मॉनिटर करण्यासाठी पालकांची गरज भासते. म्हणून सतीश यांच्या निधनानंतर वंशिकाचं इन्स्टाग्राम डिलीट करण्यात आलं होतं. आता वंशिकाचं अकाउंट शशी कौशिक पाहणार आहेत…’

हे सुद्धा वाचासतीश कौशिचक यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं.

सतीश कौशिक यांनी सिनेविश्वात तीन दशक मोलाचं योगदान दिलं. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत त्यांनी काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इकती आहे. अभिनयातून सतीश कौशिक यांनी कोट्यवधींचं संपत्ती कमावली आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंब मात्र दुःखात आहे.

बॉलिवूडमध्ये सतीश कौशिक यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी ‘मौसम’ सिनेमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केलं. अभिनेते, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात देखील सतीश कौशिक यांनी मोलाची कामगिरी केली. आपल्या विनोदबुद्धीने त्यांनी अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सतीश कौशिक यांनी जवळपास १०० सिनेमांमध्ये काम केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *