सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर ते गर्दीलाही जमू देत नाहीयेत.

सलमान खान
मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमानच्या टीमला धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली. सलमानच्या घराबाहेर ते गर्दीलाही जमू देत नाहीयेत. धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या धमकीप्रकरणी आता सलमानची प्रतिक्रिया समोर आली आहे. या सर्व घटनेवर त्याची प्रतिक्रिया काय होती, याबाबतचा खुलासा त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने केला आहे. सलमानचे कुटुंबीय आणि त्याचा जवळचा मित्रपरिवार सुरक्षेबाबत चिंतेत आहे. मात्र सलमानला धमक्यांची कोणतीच भीती नाही, असं त्याने सांगितलं आहे.