Panjabrao Dakh | पंजाबराव डख खरचं शेतकऱ्यांचं नुकसान करताहेत? की त्यांना बदनाम करण्यात येतंय? जाणून घ्या एका क्लिकवर

कृषी


Panjabrao Dakh | आज पाऊस पडेल काय? असा प्रश्न विचारताच शेतकरी मित्र म्हणतात चिंता कशाला, पंजाबराव डख (Punjabrao Dakh) नावाचं वादळ आहे ना. हवामानाची (Weather Update) तंतोतंत माहिती देणाऱ्या या वादळावर शेतकऱ्यांचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास बसलाय. पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी हवामानाचा अंदाज सांगितलं अन् तो हुकला अस क्वचितच झालं असेल. म्हणून शेतकरी बांधव अगदी डोळे झाकून म्हटलं तरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात. परंतु आता अशी एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे ज्यात ते शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन व्यापाऱ्यांची चांदी करत आहेत. नक्की हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

पंजाबराव डख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
पंजाबराव डख शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देतात. यामुळे शेतकऱ्यांना हवामान आधारित शेती करता येते. तसेच पावसामुळे शेती पिकांचे नुकसान देखील होत नाही. परंतु, एका शेतकऱ्याने असा दावा केला आहे की, पंजाबराव डख यांच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर ते व्यापाऱ्यांच्या भल्यावर आहेत. तसेच थेट त्यांनी हवामान अंदाज सांगणे बंद करावं असं खुलं आवाहन देखील केलं आहे.

काय केला शेतकऱ्याने आरोप?
इतकचं नाही, तर पंजाबराव डख कंपन्यांकडून पैसे घेतात आणि शेतकऱ्यांना चुकीचा पावसाचा अंदाज सांगून लवकरात लवकर शेतमालाची विक्री करायला लावतात. यामुळे शेतकरी गरजेपेक्षा जास्त शेतमालाची विक्री करतात आणि याचमुळे बाजारभाव ढासळतात. असा आरोप या शेतकऱ्याने त्यांच्यावर केला आहे. ज्याची ऑडियो क्लिप जोरदार व्हायरल होत आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

पंजाबराव डख यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा
पण पंजाबराव डख यांच्यावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पंजाबराव डख हे हवामानाचे अंदाज काही मनाने सांगत नाहीत. तर ते संगणकाच्या माध्यमातून उपग्रह नकाशा यांचा अभ्यास करून निरीक्षणाची नोंद घेऊन अंदाज व्यक्त करतात. त्यामुळे त्यांचे अंदाज अचूक ठरतात. पण कोणीही त्यांची बदनामी करू नये असे अनेक शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Panjabrao Dakh really harms the farmers? Or are they being defamed? Know in one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *