Agricultural Water Sources | उन्हाळ्यात पडीक जमीनही बहरणार! ‘हे’ केमिकल टाकताच बंद बोअरलाही येणारं पाणी, तरुणाच्या संशोधनाचं गडकरींकडून कौतुक

कृषी


Agricultural Water Sources | शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणूनच पाण्यासाठी शेतकरी नदी, विहीर, तलाव, शेततळे किंवा बोअरवेलचा वापर करतात. बोरवेलचा हा शहरांमध्येही आणि गावांमध्ये शेतीसाठीही केला जातो. परंतु अनेकदा काही कारणास्तव बोअरवेलमधून पाणी (Agricultural Water Source) येणे बंद होते. बोअरवेलमध्ये क्षार तसेच झाडांच्या मुळ्या, दगड, माती अडकते. म्हणून अनेकदा बोरवेल बंद पडते. आजच्या महागाईच्या युगात शेतकऱ्यांना या बोअरची तपासणी करण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. म्हणूनच एका तरुणानं एक संशोधन (Agricultural Water Sources) केलं आहे. त्याची ही भन्नाट कामगिरी पाहता थेट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच या तरुणाची पाठ थोपटली आहे.

वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

शेतकऱ्यांची चिंताच मिटली
आता बोअरवेल बंद पडले तर शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. कारण या तरुणाला शेतकऱ्यांची कायमची चिंता मिटवली आहे. तुमचं बंद पडलं तर चुटकीसरशी बोअरमध्ये केमिकल टाकून त्यातून पाणी निघू शकणार आहे. म्हणजेच या केमिकलमुळे बंद बोअरमधूनही पाणी येणार आहे. तरुणाचं हे संशोधन शेतकऱ्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. सोलापूरच्या व्यवसायाने खनिज अभियंता असलेल्या विशाल बगले या तरुणाने यावर उपाय शोधलेला आहे. त्याच्या या संशोधनाची दखल नितीन गडकरी यांनीही घेतली आहे.

काय आहे संशोधन?
विशालने शोधलेल्या तंत्रज्ञानाचे नाव आहे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान. या केमिकलच्या वापराने कोरड्या पडलेल्या बोअरमधील झरे मोकळे होऊन पाणी वाढण्यास मदत होते. हे केमिकल अल्प दरात उपलब्ध होणार आहे. यामुळे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
खालावत चाललेल्या भूजल पातळीमळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात जर भर उन्हाळ्यात बोअरवेल बंद पडली तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे रहाते. जीवापाड वाढवलेले पीक वाळून जाण्याची भीती असते. मात्र या केमिकलच्या वापराने बोअरवेलमधील झरे मोकळे होतात. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यातही पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना सुटकेचा निःश्वास टाकता येईल.

गडकरींची कौतुकाची थाप
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संशोधनासाठी विशालचे कौतुक केले आहे. त्यांनी या संशोधनाची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिली. तसेच महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प राबविण्यासाठी गडकरींनी सुचविले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The fallow land of farmers will bloom in summer! Gadkari noticed the water coming from the closed bore as soon as chemical was added, seeing the young man’s research

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *