सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी मोठी चोरी झाली आहे. तब्बल 100 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. घरातील नोकरांनीच तिच्या घरात हात साफ केला असून या दोन्ही नोकरांना अटक करण्यात आली आहे.

aishwarya rajinikanth
Image Credit source: tv9 marathi
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार थलाइवा रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी मोठी चोरी झाली आहे. सुमारे 100 तोळे सोन्याचे दागिणे, 30 ग्रॅमचे हिऱ्यांचे दागिने आणि चार किलोच्या चांदीचे दागिने चोरण्यात आले आहे. या प्रकरणी ऐश्वर्या यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, थेट रजनीकांत यांच्या कन्येच्या घरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.