चेतन कुमार हा अमेरिकन कन्नड अभिनेता आहे. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. मात्र धर्म आणि समानता या मुद्द्यांवरील ट्विटमुळे तो अनेकदा चर्चेत येतो. 2007 मध्ये त्याने ‘आ दिनगालू’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

Chetan Kumar
Image Credit source: Instagram
बेंगळुरू : कन्नड अभिनेता चेतन कुमार पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे चर्चेत आला आहे. चेतनने सोमवारी हिंदुत्वच्या मुद्द्यावरून एक ट्विट केलं होतं. या ट्विटविरोधात बजरंग दलाच्या नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी चेतनला अटक केली आहे. हिंदुत्वासंदर्भातील चेतनचं ट्विट ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.