हा एक ॲक्शन ॲडव्हेंचर ड्रामा आहे, ज्याला श्रीकांत ओडेलाने दिग्दर्शित केलं आहे. श्रीकांतनेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची कथा तेलंगणामधील कोळसा खाणींच्या अवतीभोवती फिरते. येत्या 30 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिलदारपणा!
Image Credit source: Instagram
हैदराबाद : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या दिलदारपणाची नेहमीच चर्चा होते. RRR फेम अभिनेता रामचरणने चित्रपटाच्या टीमला 11.6 ग्रॅमची सोन्याची नाणी भेट म्हणून दिली होती. इतकंच नव्हे तर त्याने संपूर्ण टीमला त्याच्या घरी नाश्त्यालाही बोलावलं होतं. अभिनेते कमल हासन यांनी ‘विक्रम’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना नवीन कार भेट दिली. तर 13 सहाय्यक दिग्दर्शकांना बाईक भेट म्हणून दिली होती. आता असाच दिलदारपणा साऊथमधल्या एका प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने दाखवला आहे. या अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाच्या टीमला 10 ग्रॅमची सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.