सनी देओल, पती धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत हेमा मालिनी; संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क – Hema Malini Net Worth biger than husband dharmendra and sunny deol

मनोरंजन


सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्यापेक्षा जास्त संपत्ती अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याकडे; कोट्यवधींची संपत्ती असलेल्या हेमा यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन.. अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी आज बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. हेमा मालिनी यांनी ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘क्रांती’, ‘ड्रीम गर्ल’, ‘अंधा कानून’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं.आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री म्हणून स्थान मिळवल्यानंतर हेमा मालिनी अनेकांच्या प्रेरणा स्थानी आहे. हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण आता हेमा मालिनी त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आल्या आहेत. मुलगा सनी देओल आणि पती धर्मेंद्र यांच्यापेक्षा अधिक संपत्ती हेमा मालिनी यांच्याकडे आहे. अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा माहिती पडल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल.

बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केल्यानंतर हेमा मालिनी यांनी स्वतःचा मोर्चा राजकारणाच्या दिशेने वळवला. २०१९ च्या निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आला. अभिनेत्रीने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, हेमा यांच्याकडे २४९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची संपत्ती मुलगा आणि पती यांच्यापेक्षा देखील अधिक आहे.

हेमा यांच्या एकून संपत्ती पैकी १४४ कोटी संपत्ती त्यांची स्वतःची आहे, तर पती धर्मेंद्र यांची संपत्ती १३५ कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हेमा यांच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमा मालिनी यांच्याकडे १७८ कोटी रुपयांचा संपत्ती आहे. ज्यामध्ये पती धर्मेंद्र यांची संपत्ती दे

हे सुद्धा वाचाहेमा यांच्याकडे कोट्यवधींच्या संपत्तीसोबतच महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. हेमा मालिनी यांच्याकडे ऑडी क्यू5, मर्सिडीज-बेंझ एम-क्लास, हुंदाई सेंटा… यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. हेमा मालिनी यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, आलिशान गाड्यांशिवाय अभिनेत्रीकडे दागिन्यांचं देखील मोठं कलेक्शन आहे.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाकडे म्हणजे अभिनेत्री सनी देओल याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. सनी देओल याच्याकडे एकून ८३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. हेमा मालिनी यांची संपत्ती मुलगा सनी यांच्यापेक्षा अधिक पटीने जास्त आहे.

हेमा आणि धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी
बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच लव्हस्टोरी पैकी एक अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची आहे. जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरु लागल्या तेव्हा कुटुंबासोबत अनेकांनी त्यांच्या नात्याचा विरोध केला.

नात्यामध्ये आलेल्या अनेक चढ – उतारांनंतर हेमा आणि धर्मेंद्र यांनी १९८० साली लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. पण लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. नव्या घरात दोघांनी संसाराला सुरुवात केली. (hema malini movies)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *