निहारिकाने ‘ओका मनसू’ आणि ‘हॅपी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. तर चैतन्यने बिट्स पिलानी आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून शिक्षण पूर्ण केलं.

Image Credit source: Twitter
हैदराबाद : बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री.. गेल्या काही वर्षांत बऱ्याच सेलिब्रिटी कपल्सच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. समंथा रुथ प्रभूपासून ते धनुषपर्यंत, साऊथच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का दिला. त्यातच आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या घटस्फोटाची चर्चा आहे. ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ्या कुटुंबाची सदस्य आहे. मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी आणि RRR फेम अभिनेता रामचरण याची चुलत बहीण निहारिका कोनिडेलाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे निहारिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती चैतन्यला अनफॉलो केलं आहे. तर चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निहारिकासोबतचे आणि लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत.