‘बधाई हो…’, ‘या’ अभिनेत्रीच्या आईने वयाच्या ४७ व्या वर्षी दिला गोंडस मुलीला जन्म – malyalam actress arya parvati mom gave birth to daughter at the age of 47

मनोरंजन


‘मला काहीही फरक पडत नाही…’, वयाच्या २३व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री झाली ताई; 47 व्या वर्षी आईने दिला गोंडस मुलीला जन्म… सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत…

मुंबई : ‘बधाई हो…’ सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. सिनेमात अभिनेत्री नीना गुप्ता यांनी उतार वयात बाळाला जन्म दिल्याने, प्रत्येक जण हैराण होता. असंच काही मल्याळम टीव्ही अभिनेत्री आर्या पार्वती हिच्या सोबत देखील झालं आहे. आर्या पार्वती हिच्या आईने वयाच्या ४७ व्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. २३ वर्षी आर्या ताई झाली आहे. जेव्हा अभिनेत्रीला कळालं की आई लवकरच आई होणार आहे, तर आर्या देखील थक्क झाली. अशात खुद्द आर्याने आईसोबत एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

आई आणि बाबांचा एक फोटो शेअर करत आर्याने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा माझी आई आठ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा बाबांनी आई गरोदर असल्याची माहिती मला फोनवरून दिली. ऐकल्यानंतर मी हैराण झाली. यावर काय बोलू, कशी व्यक्त होवू मला कळत नव्हतं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वयाच्या २३ व्या वर्षी आई – वडिलांकडून अशी गोष्ट कानावर येईल… अशी अपेक्षा देखील मी केली नव्हती. माझी आई ४७ वर्षांची आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे जाणून थोडं वेगळं वाटलं असेल. पण जेव्हा बाबांनी सांगितलं तेव्हा आई ८ महिन्यांची गरोदर होती. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माझ्या आईला ही गोष्ट कळाली तेव्हा सात महिने झाले होते.’

हे सुद्धा वाचा



आर्याने एका मुलाखतीत स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय लहान बहिणीबद्दल अभिनेत्री म्हाणाली, ‘मला लहान बहिण हवीचं होती. माझ्या जन्मानंतर आई पुन्हा बाळाला जन्म देवू शकणार नाही… असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण जेव्हा मला आई प्रेग्नेंट आहे असं कळालं तेव्हा मला फार आनंद झाली.’

‘माझ्या लहान बहिणीच्या तोंडून मी दीदी हा शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहे. याबद्दल लोक काय विचार करतात याने मला कोणताही फरक पडत नाही. थक्क करणारी गोष्ट म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं की, ती आमच्या आयुष्यात येणार आहे.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

आर्या आईच्या प्रकृतीबद्दल म्हणाली, ‘आईला अनेक महिने मासिक पाळी आली नाही. वाढत्या वयामुळे असं झालं असेल असं आईला वाटलं. म्हणून तिने लक्ष दिलं नाही. त्यामुळे वयाच्या ४७ व्या वर्षी असं काही होईल याचा विचार देखील केला नव्हता. पण मला लहान बहिण आल्यामुळे मी आनंदी आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *