शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आपला धवन आता सिंघम झाला आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘गॉड गब्बर’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सिंघम 2.0’ अशीही कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

Shikhar Dhawan
Image Credit source: Instagram
मुंबई : एकीकडे आयपीएल 2023 च्या आधी 10 टीमचे खेळाडू आपापल्या टीमसह प्रशिक्षणात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे पंजाब किंग्स टीमचा कर्णधार शिखर धवन ‘सिंघम’ बनला आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये तो दरवाजा तोडून एण्ट्री करतोय आणि पोलीस ठाण्यात आपली धमक दाखवतोय. यामध्ये तो गुंडांची धुलाई करताना आणि त्यांच्याकडून आपल्या हातापायांचीही मालिश करवून घेतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ खुद्द शिखर धवनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.