Sugarcane Harvester Subsidy | महाराष्ट्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण ऊस पिक शेतकऱ्यांना उत्पादनासाठी फायद्याचं ठरत. परंतु, त्याचं उसाला 18 महिने सांभाळून देखील त्याला तोडणी लवकर होत नाही. उसाचे गाळप संपत आले तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतात ऊस असतोच. कारण ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणूनच ऊस तोडणी जलद गतीने व्हावी यासाठी ऊस तोडणी हार्वेस्टरची (Sugar cane Harvesting) निर्मिती झाली आहे. परंतु, या हार्वेस्टरच्या किंमती खूप असल्याने ते खरेदी करणे शक्य नाही. पण आता राज्य शासनाच्या माध्यमातून हार्वेस्टरसाठी (Sugar cane Harvesting) शेतकऱ्यांना अनुदान दिला जाणार आहे.
ऊस तोडणी यंत्रासाठी मंजुरी
आता शेतकऱ्यांना ऊस तोडणी यांत्रासाठी (Sugarcane Harvesting Machine) राज्य शासच्या माध्यमातून अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता ऊस तोडणी यंत्र अनुदानाचा समावेश कृषी यांत्रिकीकरण योजनेत करण्यात आला आहे. 2022-23 आणि 2023- 24 साठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीतून राबवण्यात येणार आहे.
कोण असेल पात्र?
ऊस तोडणी यंत्रासाठी (Sugarcane Harvesting Machine) राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी आणि खाजगी साखर कारखाने तसेच शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था हे पात्र राहणार आहेत. तर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सदर करावा. तसेच ऊस तोडणी यंत्रावर लाभार्थीचे नाव, योजनेचे नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम हा सर्व तपशील कायमस्वरूपी राहील या पद्धतीने नोंदवणे आवश्यक असेल.
किती मिळेल अनुदान?
तर ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvesting Machine) खरेदी किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, इतक्या रक्कमेएवढे अनुदान देय राहणार आहे. हे अनुदान जी.एस.टी. (G.S.T.) रक्कम वगळून असेल. तसेच पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वतः उभी करणे आवश्यक आहे. तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान कर्ज खात्यात PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे.