Strike | दिवाळी नाही तर गुढी पाडवा तरी गोड व्हवा; कधी मिळणार गरिबांना आनंदाची शिधा?

कृषी


Strike | राज्य सरकारने यावर्षी गोरगरिबांची दिवाळी (Diwali) गोड व्हावी, या हेतूने दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही ठिकाणी तो वेळेवर मिळाला. तर काही ठिकाणी तो खूप उशिरा भेटला. तरी पुन्हा आता राज्यसरकारने गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु आता गुढीपाडवा हा एक दिवसावर असून देखील अमरावती
जिल्ह्यातील एकाही गोडाऊनमध्ये (Godown) आनंदाचा शिधाच पोहचला नसून त्यामुळे तेथील दुकानात शिधावाटप झालाच नाही.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

आजुन शिधा अमरावतीत पोहचला नाही

राज्यसरकारने सांगितल्या मुळे आनंदाचा शिधा घेण्यासाठी मोठ्या आशेने येत असलेल्या गोरगरीब लोक निराश होऊन त्यांना घरी परत जावं लगत आहे. तसेच आज सकाळपासूनच अमरावती शहरातील रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु दुकानात शिधाच आला नसल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागले. जर सरकारला शिधा द्यायचा होता तर मग तो गुढीपाडव्याच्या पूर्वी का दिला नाही, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला. आता सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण वीस गोडाऊन आहे. परंतु या वीस गोडाऊनपैकी एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील साडेपाच लाख कुटुंबांना शिधापासून तुर्तास तरी वंचित राहवे लागणार आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

तर आजपासून सुरू होणार आनंदाच्या शिधाचे वाटप

गरिबांचा गुढीपाडवा आनंदात साजरा व्हावा यासाठी राज्य सरकारनं गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्या चालत असलेला सरकारी संपाचा परिणाम हा या शिधा वाटपावर देखील झालाआहे. गेल्या आठवडाभरापासून सरकारी कर्मचारी हे संपावर गेले होते. मग याचा परिणाम म्हणून शिधा वाटपाला आता उशीर होणार आसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु उद्या गुढीपाडवा असला, तरी काही ठिकाणी अद्याप शिधा पोहचलेला नाही. तसेच या शिधा मधून लाभार्थ्यांना गहू, तांदूळ दिले जाणार आहेत. परंतु महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातच अद्याप आनंदाचा शिधा पोहचलेला नसल्याच समोर आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : If it is not Diwali, it should be sweet even if you pour Gudhi; When will the poor get a ration of happiness?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *