Shraddha Kapoor होती ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात, पण आईच्या एका अटीमुळे तुटलं आभिनेत्रीचं नातं – Shraddha Kapoor incomplete love story with aditya roy Kapoor

मनोरंजन


श्रद्धा कपूर हिच्या आईची ‘ती’ एक अट नाही तर, ‘या’ अभिनेत्यासोबत श्रद्धाची प्रेम कहाणी झाली असती पूर्ण…, अखेर दोघांनी घेतला विभक्त होण्याचा निर्णय…

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेम कहाण्या आहेत, ज्या कधीही पू्र्ण होवू शकल्या नाहीत. कधी सेलिब्रिटी त्यांच्यात असलेल्या भाडणांमुळे विभक्त झाले, तर काही सेलिब्रिटींनी त्यांच्या कुटुंबामुळे प्रेमाचा त्याग केला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर हिला आज बॉलिवूडमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. श्रद्धाने स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम केलं आहे. श्रद्धा आता कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री कधीही बोलताना दिसत नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र श्रद्धाच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक चर्चा होत्या. पण यावर श्रद्धाने कधीही स्पष्टीकरण दिलं नाही.

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत श्रद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्या अभिनेत्यासोबत श्रद्धाचं नाव जोडलं जात होतं, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आदित्य राय कपूर होता. आदित्य आणि श्रद्धा यांनी ‘आशिकी २’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘आशिकी २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला जमा केला.

हे सुद्धा वाचा



सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. आजही सिनेमा आणि सिनेमातील गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘आशिकी २’ सिनेमानंतर श्रद्धा आणि आदित्य यांच्या लग्नाच्या तुफान चर्चा रंगल्या. ‘आशिकी २’ सिनेमानंतर श्रद्धा आणि आदित्य यांनी ‘ओके जानू’ या सिनेमात देखील एकत्र स्क्रिन शेअर केली.

श्रद्धा आणि आदित्य यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण अभिनेत्रीच्या कुटुंबाला मात्र दोघांचं नातं मान्य नव्हतं. आदित्यसोबत श्रद्धाचं असलेलं नातं तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. आदित्यसोबत असलेल्या नात्याचा श्रद्धाच्या करिअरवर परिणाम होत आहे. असा अभिनेत्रीच्या आईचं म्हणणं होतं. अखेर श्रद्धा आणि आदित्य यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये श्रद्धा आणि आदित्य यांचं ब्रेकअप झालं.

श्रद्धा कपूर हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य आयुष्यात डीवा धवन हिची एन्ट्री झाली. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची घोषणा सर्वांसमोर केली नाही. आदित्य एका मुलाखतीत डीवा माझी चांगली मैत्रीण असल्याचं सांगितलं. पण दोघांच नातं जास्त काळ टिकलं नाही. डीवानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात अभिनेत्री अनन्या पांडे हिची एन्ट्री झाली. सध्या सर्वत्र अनन्या आणि आदित्य यांच्या नात्याने जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *