Sara Ali Khan हिला ब्रेकअपनंतर आईने सांगितले फक्त दोन शब्द…; खुद्द अभिनेत्रीकडून मोठा खुलासा – Sara Ali Khan breaks silence on her breakup with boyfriend

मनोरंजन


आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा आई खास मैत्रीण होते… सारा अली खान हिच्या ब्रेकअपनंतर आईनेच सांभाळली लेकीची बाजू… खुद्द साराने सांगितलेली ‘ती’ घटना म्हणजे…

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास मैत्रीण असते. पण एक वेळ अशी येते जेव्हा एका मुलीसाठी तिची आई खास मैत्रीण होते. अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. सारा आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर, तिच्या स्वभावामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय सारा तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत साराने ब्रेकअपनंतर घडलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. अभिनेत्रीच्या ब्रेकअपनंतर आई अमृता सिंग हिची प्रतिक्रिया काय होती याबद्दल साराने सांगितलं आहे.

मुलाखतीत साराला विचारण्यात आलं की, ब्रेकअपनंतर आईने तुला कोणते दोन शब्द सांगितले, यावर अभिनेत्री म्हणाली, ‘हे देखील ठिक आहे…’ असं आई म्हणाली. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं होते. पण रिलेशनशिपमध्ये असताना कार्तिक आणि सारा यांनी त्यांच्या नात्याला कबुली दिली नाही.

हे सुद्धा वाचा



गेल्या वर्षी दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने ब्रेकअप आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. सारा कायम तिच्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असते. शिवाय नुकताच झालेल्या मुलाखतीत साराने ‘लव आज कल २’ सिनेमाबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या.

साराचा पहिला सिनेमा ‘लव आज कल २’ अभिनेत्री सैफ अली खान याला आवडला नव्हता, याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘ते आनंदी नव्हते. त्यांना माझा अभिनय आवडला नाही. सिनेमा चांगला नव्हता असं देखील ते म्हणाले…’ इम्तियाज अली यांच्या 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव आज कल’ सिनेमात सैफ अली खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पहिला सिनेमा अपयशी ठरल्यानंतर अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत साराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता सारा ‘गॅसलाइट’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सारासोबत अभिनेता विक्रांत मैसी आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहें. सिनेमा ३१ मार्च रोजी Disney+ Hotstar प्रदर्शित होणार आहे. साराने सिनेमाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *