Onion Subsidy | शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना कांदा अनुदान मंजूर, त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

कृषी


Onion Subsidy | कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता कांदा उत्पादक (Onion Subsidy) शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान (Onion Subsidy) मंजूर झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मंजूर झाले आहे.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

कांदा उत्पादकांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय
तर 2018 आणि 19 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली आहे. परंतु अद्याप देखील पात्र न करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आले आहेत. या शेतकऱ्यांसाठी आज 21 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

किती निधी वितरीत करण्यास दिली मंजुरी?
2018 आणि 19 मध्ये लक्ष्मी सोपान ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केटिंग कंपनी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर बाजार समितीमध्ये, कांद्याची विक्री केलेली पात्र लाभार्थ्यांना अवलंबित कांदा अनुदान मिळणार आहे. या वर्षांमध्ये या जिल्ह्यातील कांदा विक्री केलेल्या 8 हजार 74 शेतकऱ्यांना 7 कोटी 47 लाख रुपयांचा निधी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

कांदा उत्पादकांना दिलासा
खरं तर, 2018 आणि 19 मध्ये कांद्याचे भाव गडगडले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. म्हणूनच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये आणि प्रति शेतकरी जास्तीत जास्त 200 क्विंटल कांदा मर्यादेमध्ये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. आता उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 47 लाख रुपयांचा निधी वितरीत करणासाठी मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Onion subsidy approved for farmers, know immediately will you get it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *