बॉलिवूडशिवाय किरण खेर यांनी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘प्रतिमा’, ‘गुब्बारे’, ‘इसी बहाने’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. या व्यतिरिक्त त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या परीक्षकपदाची धुराही सांभाळली आहे.
Kirron Kher
Image Credit source: Facebook
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. 20 मार्च रोजी किरण खेर यांनी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं. ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’, असं त्यांनी लिहिलंय.