Gudipadwa Muhurta 2023 | साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला आहे वैज्ञानिक महत्व, जाणून घ्या योग्य मुहूर्त

कृषी


Gudipadwa Muhurta 2023 | साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा सण म्हणजे गुढीपाडवा. भारतात सणावारांना प्रचंड महत्व दिले जाते. त्याचप्रमाणे कोणतही शुभ काम करायचे असेल तर मुहूर्त पाहिला जातो. तर मग शुभ कार्यासाठी उद्याचा दिवस सोन्याहून पिवळा ठरेल. सोने खरेदी तसेच इतर कोणतीही खरेदी या शुभ मुहूर्तावर आवर्जून केली जाते. गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्ष सुरू होते. चला तर मग जाणून घेऊयात गुढी उभारण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ असेल.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढीपाडवा या सणाला महाराष्ट्रात प्रचंड महत्व आहे. या मंगलमय प्रसंगी घरातील नवविवाहित जोडप्यांच्या हातून गुढी उभारली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा केला जातो. कुठेही पाहायला गेलात तर सगळीकडे प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला गुढी उभारलेली दिसेल.

गुढीपाडव्याचे वैज्ञानिक महत्व
गुढीपाडव्याला केवळ अध्यात्मिक महत्व नाही, तर वैज्ञानिक महत्व देखील आहे. कारण आजच्या दिवशी गुढीला कडुनिंबाचा पाला बांधला जातो. या पाल्याचे गुळात टाकून प्रसाद म्हणून सेवन केले जातो. जे शरीरासाठी चांगले असते. उन्हाळ्यात हा पाला खाल्ल्यामुळे आरोग्य शुद्ध आणि निरोगी राहते.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

का केला जातो साजरा?
आता तुम्ही म्हणालं साडे तीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याला मानलं जातं. मग गुढी उभारण्यासाठी कशाला हवाय मुहूर्त? पण कोणताही शुभ कार्याची ही शुभ वेळ असते. तर सकाळी 6.29 ते 7. 39 या मुहूर्तावर सर्वांनी आपल्या घरापुढे गुढी उभारावी. गुढीवर तांब्याचा कलश, नवीन वस्त्र, कडूलिंबाचा पाला, साखरेची घाटी बांधून त्यावर हळदीकुंकू वहावे. अशाप्रकारे पूजा करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Gudipadwa, which is one of the three and a half Muhurtas, has scientific significance, know the correct Muhurtas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *