Crop Insurance | सुप्रीम कोर्टाचा पीक विमा कंपनीला (bajaj crop insurance) दणका; शेतकऱ्यांना रक्कम देण्यास दिरंगाई केल्याने दिले ‘हे’ आदेश

कृषी


Crop Insurance | नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा क्लेम करावा लागतो. परंतु अनेकदा शेतकरी पात्र ठरवूनही पिक विमा (Crop Insurance) कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्यासाठी आखडता हात घेण्यात येतो. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे पिक विमा (Crop Insurance) कंपन्या त्यांना देण्यास विलंब करतात. यामुळे अनेकदा पिक विमा कंपन्यांना फटकारले जाते. आता शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीला सुप्रीम (supreme court order) कोर्टाने चांगलंच फटकारले आहे.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

पीक विमा कंपनीला सुप्रीम कोर्टाचा दणका
बजाज अलायन्स पीक विमा (Crop Insurance) कंपनीला सुप्रीम कोर्टाने चांगला दणका दिला आहे. या कंपनीने धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या विम्याचे 315 कोटी रुपये रोखून ठेवले होते. त्यामुळे बजाज कंपनीला (bajaj crop insurance) सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. आता थेट सुप्रीम कोर्टाने या कंपनीच्या अध्यक्षांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात थेट अवमानाची नोटीसही बजावण्यात आली आहे.

किती शेतकरी आहेत वंचित?
धाराशिव जिल्ह्यातील 3 लाख 27 हजार 287 शेतकरी अद्यापही पीक विमा पासून वंचित आहेत. पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्यासाठी दिरंगाई करत असल्यामुळे शेतकरी नाराज होते. परंतु आता शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची गोड बातमी देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने थेट पीक विमा कंपनीला मोठा दणका दिला आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

सुप्रीम कोर्टानं (supreme court order) दिले महत्वपूर्ण आदेश
बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने (bajaj crop insurance) यापूर्वी शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये दिले होते. परंतु, शेतकऱ्यांना उर्वरित 315 कोटी रुपये देण्यास कंपनी दिरंगाई करत आहे. सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. सुप्रीम कोर्टाकडून (supreme court order) थेट पिक विमा कंपनीच्या अध्यक्षांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Supreme Court hits out at crop insurance company; This order was given due to delay in payment of amount to the farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *