कैथी या तमिळ चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वांत आधी त्याच्या मुलीला भेटायचं ठरवतो. मात्र पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात तो अडकतो. भोला या चित्रपटात आमला पॉल या अभिनेत्रीचीही भूमिका आहे.

Bholaa
Image Credit source: Instagram
मुंबई : शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटांनंतर आता अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘दृश्यम 2’च्या यशानंतर अजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘भोला’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल करेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अजय देवगणच्या भोलाची ॲडव्हास बुकिंगचे आकडे मात्र सकारात्मक आहेत.