शाहरुख खान याने फराह खान हिच्या पतीला केली होती मारहाण, या चित्रपटामुळे झाला मोठा वाद – Shah Rukh Khan beat Farah Khan’s husband due to this reason

मनोरंजन


शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट हिट ठरला. शाहरुख खान आता त्याच्या आगामी जवान चित्रपटाचे शूटिंग करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

मुंबई : शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी नक्कीच केलीये. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हा ठरला आहे. विशेष म्हणजे चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खान याने त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीये. सध्या शाहरुख खान हा त्याच्या जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जवान चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ लीक झाले होते, या व्हिडीओमध्ये (Video) शाहरुख खान याचा खतरनाक लूक दिसला.

शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत लक्की ठरले आहे. कारण या वर्षात शाहरुख खान याचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आणि या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केलीये.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामुळेच वाद सुरू झाला होता. या गाण्यात दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला. चित्रपटाच्या विरोधात अनेक संघटना आक्रमक झाल्याचे देखील बघायला मिळाले.

सर्वांनाच माहिती आहे की, फराह खान ही शाहरुख खान याचे मानलेली बहीण आहे. इतकेच नाहीतर फराह खान हिच्या लग्नामध्ये भावाच्या भूमिकेत शाहरुख खान हा दिसला. मात्र, फराह खान हिचा पती शिरीष कुंदर आणि शाहरुख खान यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. इतकेच नाहीतर थेट शाहरुख खान याने शिरीष कुंदर याच्या कानाखाली जाळ काढला.

2011 मध्ये शाहरुख खान याचा रा वन हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर फराह खान हिचा पती शिरीष कुंदर हा सतत सोशल मीडियावर शाहरुख खान याच्या चित्रपटाच्या विरोधात पोस्ट शेअर करताना दिसला आणि हाच राग शाहरुख खान याच्या मनात होता. शाहरुख खान हा फक्त एका संधीच्या शोधत होता.

संजय दत्त याने अग्निपथ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बाॅलिवूडच्या मोठ्या सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीत शाहरुख खान, शिरीष कुंदर आणि फराह खान उपस्थित होते. या पार्टीत शिरीष कुंदर याने रा वन चित्रपटाबद्दल काहीतरी कमेंट केली. ही कमेंट ऐकून शाहरुख खान भडकला.

शिरीष कुंदर याची कमेंट ऐकून शाहरुख खान याचा पारा चांगलाच चढला आणि त्याने थेट शिरीष कुंदर याच्या कानाखाली एक ठेवून दिली. इतेकच नाहीतर शिरीष कुंदर आणि शाहरुख खान यांच्यामध्ये त्यादिवशी तूफान मारहाण झाली. त्यानंतर काही दिवसांनी शिरीष कुंदर याने सांगितले की, फक्त शाहरुख खान यानेच नाहीतर त्याच्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही आपल्याला मारहाण केली. त्यानंतर काही वर्षांनी यांच्यामधील वाद मिटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *