मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलीम खान यांची उडाली रात्रीची झोप? सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ – Salman Khan’s father Salim Khan is tensed after receiving death threats

मनोरंजन


सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा बहुचर्चित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, सलमान खान याला ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यामुळे सलमान सध्या चर्चेत आहे.

मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील दोन गाणे अगोदरच रिलीज करण्यात आले आहेत. चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. इतकेच नाहीतर या चित्रपटात श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.

किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सलमान खान हा प्रचंड चर्चेत आलाय. सलमान खान याला ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. सलमान खान याला धमकी मिळाल्यापासून त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिलीये. आता मुंबई पोलिसांनी देखील सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. मुंबईमध्ये गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये सलमान खान राहतो. सलमान खान याच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा पारा आहे. पोलिसांच्या दोन गाड्या सलमान खान याच्या घराबाहेर तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच सलमान खान याचा सुरक्षारक्षक शेरा हा त्याच्या खासगी सुरक्षेवर लक्ष देऊ आहे.

सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मात्र, या धमकीला सलमान खान याने फार काही गंभीर घेतले नसल्याचे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून त्याचे वडील सलीम खान हे टेन्शमध्ये आहेत. सलमान खान याला मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे सलीम खान यांची रात्रीची झोप उडाल्याचे सांगितले जात आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला माफी मागण्यास सांगितले होते. सलमान खान याने माफी मागितली नसल्याने त्याला परिणाम भोगावे लागणार असल्याचे लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले होते. मात्र, यासर्वांवर सलमान खान याने काही उत्तर दिले नाहीये. सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *