बाल कलाकार रीवा अरोरा हिच्या महागड्या कारची सर्वत्र चर्चा; नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘लायसन्स आहे का?…’ सध्या सर्वत्र रीवा हिच्या सोशल मीडिया पोस्टची सर्वत्र चर्चा…
मुंबई : प्रसिद्ध बाल कलाकार रीवा अरोरा (Riva Arora) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर रीवाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी संख्या आहे. रीवा फक्त १३ वर्षांची आहे. पण रीवा तिच्या गलॅमरस अंदाजामुळे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रीवा कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांच्या संपर्कात असते. पण आता रीवा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रीवाने वयाच्या १३ व्या वर्षी दहा वीस नाही तर, तब्बल ४४ लाख रुपयांची गाडी खरेदी केली आहे. ज्यामुळे रीवा तुफान चर्चेत आली. खुद्द रीवाने सोशल मीडियावर नव्या आणि महागड्या कारचे काही फोटो पोस्ट केले आहेत. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
रीवाने इन्स्टाग्रामवर १०.६ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. इन्स्टाग्रामवर १०.६ मिलियन फॉलोअर्स झाल्यामुळे रीवाने स्वतःला महागडी गाडी गिफ्ट म्हणून दिली आहे. रीवा इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री कारसोबत पोज देताना दिसत आगहे. सध्या सर्वत्र रीवाच्या फोटोंची चर्चा आहे.
रीवाने आनंद साजरा करण्यासाठी ४४ लाख रुपयांची काळ्या रंगाची ऑडी लक्जरी कार खरेदी केली आहे. फोटो शेअर करत रीवाने कॅप्शनमध्ये, ‘मला माहिती आहे की, मला फार उशीर झाला आहे. पण अखेर इन्स्टाग्रामवर माझं १०.६ मलियन एवढं मोठं कुटुंब तयार झालं आहे. तुमचे खूप खूप आभार…’
पुढे रीवा म्हणाली, ‘मी तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करते. मी माझा आनंद व्यक्त करु शकत नाही. माझ्या इन्स्टाग्राम कुटुंबाला भरपूर प्रेम.. तुम्ही दिलेलं प्रेम आणि समर्थनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हाला भरपूर प्रेम… हा दिवस मी कधीही विसरु शकत नाही…’ असं देखीर रीवा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाली आहे.
रीवाचा पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे तर, अनेकांनी मात्र रीवाला ट्रोल केलं आहे. अनेकांनी रीवाला ‘लायसेन्स’ आहे का? असा प्रश्न विचारला. कारण अभिनेत्री फक्त १३ वर्षांची आहे.
रीवा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. फार कमी वयात रीवाने यश मिळवलं आहे. रीवाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेम व्यक्त करत असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रीवा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.