‘त्या’ एका किसमुळे नशीब फिरलं… नाहीतर आज राणी मुखर्जी बच्चन कुटुंबातील सून असती; हा किस्सा माहित्ये का? – A kiss became the reason for Rani mukharjee Abhishek Bachchans breakup

मनोरंजन


Rani Mukerji Birthday : करिश्मा कपूरसोबत झालेला साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. राणी बच्चनन कुटुंबाची सून होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अचानक या बातम्यांना ब्रेक लागला आणि अभिषेकने राणी मुखर्जीऐवजी ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.

नवी दिल्ली : निखळ हास्य आणि दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अभिराज्य करणाऱ्या राणी मुखर्जीचा (Rani Mukharjee)  आज वाढदिवस असतो. राणीने चित्रपटसृष्टीवर एकेकाळी खरंच राज्य केले होते. अनेक हिट्स देऊन मनोरंजन सृष्टीत आघाडीवर होती. त्याचवेळी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा सुरू होत्या. उत्तम अभिनेत्री असलेली राणी आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळ होते. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचे काही चित्रपटही (movies) एकत्र प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये दोघांची जोडी लोकांच्या खूप पसंतीस उतरली होती. त्यावेळी या दोघांच्या प्रेमाच्या चर्चाही बॉलिवूडमध्ये (bollywood)रंगल्या होत्या.

करिश्मा कपूरसोबत झालेला साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. राणी बच्चनन कुटुंबाची सून होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अचानक या बातम्यांना ब्रेक लागला आणि अभिषेकने राणी मुखर्जीऐवजी ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.

राणी मुखर्जीसोबतचे अभिषेक बच्चनचे नाते तुटण्याचे कारण त्याची आई जया बच्चन या मानल्या जातात. असल्याचे मानले जाते. राणीच्या एका किसिंग सीनमुळे जया बच्चन नाराज झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचाअमिताभ बच्चन यांना केले होते किस

राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लॅक’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट खूप गाजला होता. राणी व अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते. मात्र या चित्रपटात राणी मुखर्जीला शेवटी अमिताभ बच्चन यांना लिप किस करावे लागले होते. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा भावनांनी भरलेला एक उत्कट चित्रपट होता, ज्यामध्ये राणी व अमिताभ यांनी अक्षरश: झोकून देऊन काम केले होते. त्यांच्या या भूमिका खूप अप्रतिम झाल्या, खूप नावजल्याही गेल्या. त्या दोघांचा उत्तम अभिनय आणि चित्रपटाची उत्तम कथा आणि दिग्दर्शन यामुळे चित्रपट अप्रतिम झाला. संपूर्ण चित्रपटात सर्व काही ठीक होते, पण जया बच्चन यांना चित्रपटातील लिप किसिंग सीनवर आक्षेप होता. आपल्या भावी सुनेने सासऱ्याचे चुंबन घ्यावे हे जया बच्चन यांना पटले नव्हते. मात्र राणी मुखर्जी या सीनसाठी तयार झाली. चित्रपट तर पूर्ण झाला, खूप नावजलाही गेली. पण याचा फटका राणीला अभिषेक बच्चनसोबतच्या ब्रेकअपच्या रूपाने सहन करावा लागला.

राणीने व्यक्त केली होती नाराजी

या एका सीनमुळे जया बच्चन यांची नाराजी इतकी वाढली होती की, राणी मुखर्जीला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्नातही बोलावण्यात आले नव्हते. असे म्हटले जाते की यानंतर राणी मुखर्जीने तिची नाराजी व्यक्त केली आणि असेही म्हटले की ती अभिषेक बच्चनला चांगला मित्र मानत होती परंतु तो केवळ एक को-स्टारच राहिला. अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राणी मुखर्जीने यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *