जान्हवी कपूर हिचे हे बोलणे सारा अली खान हिला खटकले, अभिनेत्रींमधील वाद चव्हाट्यावर? – Sara Ali Khan did not like Janhvi Kapoor’s speech

मनोरंजन


सारा अली खान आणि जान्हवी कपूर या चांगल्या मैत्रीनी आहेत. मात्र, यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचे कळत आहे. सारा अली खान ही सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झालाय.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही सध्या तिच्या आगामी गॅसलाइट या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने लग्झरी गाडी सोडून चक्क रिक्षाने प्रवास केला. सारा अली खान हिने याचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर अनेकांनी सारा अली खान हिचे काैतुक केले. सारा अली खान कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. काही दिवसांपूर्वीच तिने टिंकू जिया या गाण्यावर धमाल डान्स केला.

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. सारा अली खान हिने केदारनाथ या चित्रपटाच्या माध्यमातून 2018 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे आतापर्यंत सारा अली खान हिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सारा अली खान हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिने धडक या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. मिली या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनीच केलीये.

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला करिअरमध्ये प्रगती करण्याच्या आतापर्यंत अनेक संधी मिळाल्या आहेत. मात्र, मला अजूनही सन्मान मिळाला नाहीये. आता जान्हवी कपूर हिच्या याच विधानावर नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सारा अली खान हिने मोठे भाष्य केले आहे.

सारा अली खान हिने जान्हवी कपूर हिच्या या विधानाशी असहमत असल्याचे म्हटले आहे. सारा अली खान म्हणाली, मला वाटत नाही की, जान्हवी कपूर हिला कमी सन्मान मिळाला आहे. आपल्यावर एक अभिनेत्री म्हणून लोक प्रेम करतात तो एक सन्मानच असल्याचे सारा अली खान हिने म्हटले आहे. सारा पुढे म्हणाली की, मला वाटते की लोकांनी मला स्वीकारले आहे…तर तो एकप्रकारचा सन्मानच आहे.

सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन याने सारा अली खान हिच्यासोबतच्या रिलेशनवर मोठे भाष्य केले आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. इतकेच नाहीतर यांचे काही फोटो व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *