करणी सेनेच्या निशाण्यावर एमसी स्टॅन, थेट दिला हा मोठा इशारा, रॅपरच्या अडचणी वाढणार? – Karni Sena gave this big warning to MC Stan

मनोरंजन


बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा बिग बाॅस जिंकल्यापासून सतत चर्चेत आहे. सर्वांना मोठ धक्का देत एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 जिंकले. आता विविध शहरांमध्ये शो करताना रॅपर एमसी स्टॅन हा दिसत आहे. विशेष म्हणजे एमसी स्टॅन याची फॅन फाॅलोइंग देखील वाढली आहे.

करणी सेनेच्या निशाण्यावर एमसी स्टॅन, थेट दिला हा मोठा इशारा, रॅपरच्या अडचणी वाढणार?

Image Credit source: Instagram

मुंबई : बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एमसी स्टॅन याने सर्वांना मोठा धक्का देत बिग बाॅस 16 चा ताज जिंकला. सर्वांनाच वाट होते की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी हे बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चे विजेते होतील. जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असल्याने एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. बिग बाॅस 16 मध्ये काही खास गेम खेळताना एमसी स्टॅन हा दिसला नाही. बिग बाॅस 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅन याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये (Fan following) मोठी वाढ झालीये. एमसी स्टॅन हा सध्या भारत दाैऱ्यावर असून मोठ्या शहरांमध्ये याचे शो होत आहेत.

बिग बाॅस 16 जिंकल्यानंतर लगेचच एमसी स्टॅन याने आपला भारत दाैऱ्याची चाहत्यांना माहिती दिली. रॅपर एमसी स्टॅन याची मोठी फॅन फाॅलोइंग आहे. बिग बाॅसच्या घरात एमसी स्टॅन, शिव ठाकरे, साजिद खान, अब्दू रोजिक, सुंबुल ताैकीर आणि निम्रत काैर यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळाली.

17 मार्चच्या रात्री इंदूरच्या लासुदिया भागामध्ये हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू होता. दरम्यान, करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक स्टेजवर येत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. एमसी स्टॅन याने शोदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करणी सेनेने केला. या सर्व गोंधळानंतर शो रद्द करण्यात आला.

आता थेट करणी सेनेने एमसी स्टॅन याला मोठा इशारा दिला आहे. यामुळे एमसी स्टॅन याच्या शोमध्ये गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. करणी सेनेचा आरोप आहे की, रॅपर एमसी स्टॅन हा शोदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरतो. इतकेच नाहीतर तो मुलींबद्दल देखील काही आक्षेपार्ह बोलतो. इंदूरमधील शो रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली होती.

करणी सेना युथ अध्यक्ष भागवत सिंह बालोट यांनी आता इंदूरमधील शो रद्द होण्याचे कारण सांगितले आहे. भागवत सिंह बालोट म्हणाले की, एमसी स्टॅन याचा शो पाहणाऱ्या तरूणांवर काय परिणाम होईल. तो शोदरम्यान अपशब्द वापरतो. आमचे म्हणणे आहे की, त्याने शोदरम्यान चुकीचे शब्द वापरू नये. एमसी स्टॅन याच्यासोबत त्या रॅपरचा राग येतो जे शोमध्ये शिव्या वगैरे देतात. जर शोमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरणे बंद केले नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा आता एमसी स्टॅन याला करणी सेनेकडून देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *