Video | सासरी जाताना ढसाढसा रडताना दिसली स्वरा भास्कर, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लावला क्लास – Swara Bhaskar was trolled on social media after she was seen crying during vidai

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने जानेवारी महिन्यातच लग्न केले. मात्र, लग्नाची गोष्ट जाहिर केल्यापासूनच स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. सतत तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मुंबई : जानेवारी महिन्यात बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने कोर्टात लग्न केले. विशेष म्हणजे स्वरा भास्कर हिने तिच्या लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवत फेब्रुवारीमध्ये तिने लग्न केल्याचे सोशल मीडियावर जाहिर केले. स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले. फहाद अहमद याच्यासोबत लग्न (Marriage) केल्याने स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबतच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. विशेष म्हणजे लग्नानंतरचे अनेक फोटो व्हायरल झाले. हिंदू रितीरिवाजानुसार पुन्हा एकदा फहाद अहमद याच्यासोबत लग्न गाठ बांधण्याचा निर्णय स्वरा हिने घेतला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले.

काही दिवसांपूर्वी स्वरा भास्कर हिच्या हळदीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये स्वरा भास्कर हिचा लूक जबरदस्त दिसत होता. हळदीपासून रिसेप्शनपर्यंत प्रत्येक कार्यक्रम खास पध्दतीने पार पडले आहेत. दिल्ली येथे स्वरा भास्कर हिच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या रिसेप्शनला अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली.

सध्या सोशल मीडियावर स्वरा भास्कर हिचा सासरी जातानाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे स्वरा भास्कर हिला ट्रोल केले जातंय. नेटकऱ्यांना स्वरा भास्कर हिचा सासरी जातानाचा व्हिडीओ अजिबातच आवडलेला नाहीये. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी स्वरा भास्कर हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये.

या व्हिडीओमध्ये स्वरा भास्कर हिने गुलाबी रंगाची लेहेंगा घातलाय आणि स्वरा भास्कर खूप जास्त भावूक झाल्याचे दिसत आहे. इतकेच नाहीतर यावेळी तिला आपले अश्रू लपवणे देखील कठीण झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, स्वरा भास्कर हिचा सासरी जातानाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला दिसत नाहीये.

सासरी जात असतानाच्या व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांची विदाई होत आहे? दुसऱ्याने लिहिले की, मला तर या व्हिडीओमध्ये कुठेच अश्रू दिसत नाहीये. तिसऱ्याने लिहिले की, किती नाटकीपणा आहे हा सर्व…अजून एकाने लिहिले की, विदाईला सुध्दा नमाज बनवले आहे. आता स्वरा भास्कर हिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *