स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी कोर्ट मॅरेज केलं. या लग्नाचा खुलासा तिने जवळपास 40 दिवसांनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत केला.

Swara Bhasker
Image Credit source: Instagram
नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केल्यानंतर विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हळद, मेहंदी, संगीत अशा सर्वसामान्य कार्यक्रमांसोबतच स्वराने कव्वाली नाईट, कर्नाटक संगीत असे हटके कार्यक्रमसुद्धा आयोजित केले होते. त्यानंतर रिसेप्शनला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीतील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वराने तिच्या रिसेप्शनमध्ये पाकिस्तानी फॅशन डिझायनरने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. तर फहादने पांढऱ्या आणि सोनेरी रंगसंगतीची शेरवानी घातली होती.