Stock Market Closed | 900 अंकांपर्यंत घसरल्यानंतर बाजार खालच्या पातळीवरून सावरला, तर सेन्सेक्स ‘इतक्या’ अंकांनी घसरला

कृषी


Share Market Closed | अमेरिका आणि युरोपमधील बकिंग संकटाचा फटका भारतीय शेअर बाजाराला सहन करावा लागला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market Closed) मोठी घसरण झाली आहे. गुंतवणुकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे दिवसभरात सेन्सेक्स 900 अंकांनी तर निफ्टी 270 अंकांनी घसरला. मात्र, खालच्या स्तरावरून बाजारात रिकव्हरी परत आली. असे असूनही बीएसई सेन्सेक्स 360 अंकांनी घसरून 57,628 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (Share Market Closed) निफ्टी 111 अंकांनी घसरून 16,988 अंकांवर बंद झाला.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

सेक्टरॉल
आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, धातू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण झाली आहे. तर एफएमसीजी, मीडिया सेक्टरच्या शेअरने वेग पकडला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही घसरले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 5 समभाग हिरव्या चिन्हात आणि 25 समभाग लाल चिन्हात बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 13 वाढले तर 37 समभाग घसरले.

बाजारातील चढ उतार
आजच्या व्यवहारात एचयूएल 2.61 टक्के, बीपीसीएल 2.35 टक्के, आयटीसी 0.87 टक्के, ग्रासिम 0.48 टक्के, नेस्ले 0.42 टक्के, कोटक महिंद्रा 0.39 टक्के, सन फार्मा 0.37 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या समभागांवर नजर टाकल्यास, बजाज फिनसर्व्ह 4.33 टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायझेस 3.82 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 3.17 टक्क्यांनी, हिंदाल्को 2.76 टक्क्यांनी आणि विप्रो 2.48 टक्क्यांनी घसरले.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. शेअर बाजार BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 255.64 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे शुक्रवारी 257.59 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.95 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Market recovers from lows after falling to 900 points, while Sensex falls by many points

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *