Irrigation Scheme | ब्रेकिंग! मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरणास मान्यता

कृषी


Irrigation Scheme | शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाण्याची गरज लागते. परंतु शेतीला मोकळं पाणी देण्यासाही पाण्याचे प्रमाण जास्त लागते. उन्हाळ्यात तर शेतीसाठी मोकळ पाणी देणे शक्यच नसतं. तसेच विनाकारण पाण्याचा जास्त वापरही होतो. म्हणूनच यावर तोडगा काढण्यासाठी सिंचनाची उत्पती झाली. परंतु शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचन (Irrigation Scheme) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. म्हणून शेतकरी इच्छा असूनही शेतीमध्ये सिंचनाची सोय करू शकत नाहीत. म्हणूनच राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (Irrigation Scheme) राबवली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

वाचादुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार?

अनुदानाचा दुसरा टप्पा वितरीत
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. परंतु गेली तीन वर्षे या योजनेच्या अनुदानासाठी शेतकरी प्रलंबित होते. आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेसाठी दुसरा टप्पा वितरित करण्यात आला आहे.

किती अनुदान वितरीत करण्यास मान्यता?
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी 17 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले आहे. या शासन निर्णयांमध्ये कृषी सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आले आहे. मुख्यमंत्री शासन कृषी शाश्वत योजनेसाठी आतापर्यंत 210 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 80 टक्के अनुदान दिले जाते.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

शेतकऱ्यांना अनुदानाचा होतो मोठा फायदा
शेतकऱ्यांना शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन अधिक फायद्याचं ठरत. ज्याचं कारण म्हणजे या सूक्ष्म सिंचनामुळे पाणी जास्त वाया जात नाही. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून सिंचनासाठी विविध योजनांद्वारे अनुदान दिले जाते. म्हणूनच शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Approval for disbursement of crores of funds for the second phase of the Chief Minister’s Sustainable Agricultural Irrigation Scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *