सुशांत सिंह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियन मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या 6 दिवसांनंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला.

दिशा सालियनच्या एक्स बॉयफ्रेंडचं लग्न
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेता रोहन राय त्याच्या ‘पिया अलबेला’ या मालिकेतील सहकलाकार शीन दास हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचं लग्न 22 एप्रिल रोजी काश्मिरमध्ये मोजक्या कुटुंबीयांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी रोहनची एक्स गर्लफ्रेंड दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरचंही काम केलं होतं. रोहन आणि शीनच्या लग्नाच्या एक दिवस आधी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे.