Deepika Padukone Yuvraj Singh Break Up: Deepika Padukone आणि युवराज सिंगमध्ये कधी सुरु झालेलं अफेयर? दीपिका पादुकोणला युवराज सिंगची कुठली गोष्ट नाही आवडायची?

yuvraj-deepika
Image Credit source: instagram
Deepika Padukone Yuvraj Singh Break Up : बॉलिवूड आणि क्रिकेटच 70 च्या दशकापासून नात आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ही सुरुवात झाली. आजही बॉलिवूडच्या तारका आणि टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर्समध्ये अफेयरच्या बातम्या येत असतात. यात विराट कोहली-अनुष्का शर्मासारखी काही रिलेशनशिप विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतात, तर दीपिका पादुकोण-युवराज सिंगसारखा काही नात्यांचा प्रवास मध्येच थांबतो. आज दीपिका पादुकोणचा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. सुरुवातीपासूनच लोकांची नजर चित्रपटांपेक्षा तिच्या व्यक्तीगत आयुष्यावर राहिली आहे.