Cotton Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! देशातील कापसाचे दर सुधारणार का नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

कृषी


Cotton Rate | सध्या बाजारात कापसाची विक्री सुरू आहे. तर देशामधील कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास चार-पाच महिने उलटले आहे. पहिल्या तीन महिन्यांत कापसाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला होता. यामुळे कापूस (Cotton Rate) उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. परंतु आता आगामी काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशातील कापसाचे दर (Cotton Rate) सुधारतील का नाही.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

चालू महिन्यात कापसाचे दर दबावात
मार्च महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात कापसाच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. ज्याचं कारण म्हणजे देशातील बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. तसेच अमेरिकेतील बॅकींग क्षेत्रामधील संकटामुळे बाजार दबावात आहे. म्हणूनच कापसाचे दर दबावात आहे. त्यासह कापूस उत्पादन घटण्याची अंदाज वर्तवण्यात आला असून देखील याचा दरावर कोणताही परिणाम होत नाहीये.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

देशातील कापसाची आवक कशी आहे?
चालू महिन्यात बाजारातील कापसाची आवक वाढली आहे. याचा परिणाम थेट दारावर होत आहे.
सध्या मार्चमध्ये कापसाची आवक सरासरी 60 ते 65 हजार गाठींदरम्यान असते. परंतू, सध्या देशातील बाजारात कापसाची आवक 1 लाख 20 ते 1 लाख 35 हजार गाठींच्या दरम्यान आवक होतेय. म्हणूनच कापसाचे दर दबावात आहेत.

कापसाचे दर सुधारणार का?
देशातील बाजारात कापसाचे दर सुधारतील का? नाही हे जाणून घेऊयात. तर देशात सध्या कापसाला 7 हजार 700 ते 8 हजार 100 रुपये दर मिळत आहे. कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज असल्याने एप्रिल महिन्यात कापसाचे दर सुधारू शकतात. मात्र, कापसाच्या दरात 300 ते 400 रुपयांची वाढ होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Attention farmers! Why not reform the price of cotton in the country? Know in one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *