बाॅलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी हा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा आहे. विशेष म्हणजे रोहित शेट्टी याच्या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झालाय. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास तयार आहे. रोहित शेट्टी याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाईफ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे ट्रेलरही रिलीज करण्यात आले आहे. बिग बाॅस 15 (Bigg Boss 15) विजेती तेजस्वी प्रकाश ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश हिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आता या चित्रपटाचा ट्रेलर (Movie trailer) रिलीज झालाय. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय.