“सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”

महत्वाच्या बातम्या


मुंबई | मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टीका केली आहे. सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत. हे आमचं दुर्दैव आहे. सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली. येथील 95 ते 97 टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं. अधिकारापासून वंचित ठेवलं. तो सनातन धर्म आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) सांगितलं.

आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही लोक आग लावण्याचं काम करून, भावना बिघडवतात. जातीवादाचं राजकारण करून धर्मा-धर्मात तेढ निर्माण करत मतं मिळवणं, हेच राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाडांचं काम आहे, अशी टीका बावनकुळेंनी आव्हाडांवर केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *