मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात ट्विट करून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं आहे.
राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. विधानपरिषदेतही यावरून आवाज उठवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांनी या मुलीचा अत्यंत गंभीर, रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो ट्विट करत भाजप नेत्यांवर आरोप केले होते.
पोक्सो कायद्यानुसार, अल्पवयीन पीडित मुलीची ओळख पटेल, असं कृत्य करणं गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र संजय राऊत यांनी त्या अल्पवयीन मुलीचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-