अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2003 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. जवळपास 33 वर्षांनंतर दीपकने नादर यांच्यासोबत मिळवून ‘टिप्सी’ या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली होती.

Deepak Tijori
Image Credit source: Twitter
मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरीसोबत फसवणुकीची घटना घडली आहे. याप्रकरणी त्याने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीपक तिजोरीने त्याच्या तक्रारीत खुलासा केला की त्याच्यासोबत कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीचा आरोप त्याने सहनिर्माता मोहन नादर यांच्यावर लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.