जेव्हा शाहरुख खानसोबत घडला मोठा अपघात, थोडक्यात जीव वाचला, किंग खानचा श्वास थांबला आणि… – bollywood star shahrukh khan got injured during koyla film

मनोरंजन


अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचला होता अभिनेता शाहरुख खान याचा जीव, किंग खानचा श्वास थांबला आणि…, घडलेल्या ‘त्या’ घटनेबद्दल खुद्द किंग खान म्हणाला…

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करत असताना किंग खान याला अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना कराला लागला. पण शहरुख कधीही खचला नाही, त्याने स्वतःचा प्रवास सुरुच ठेवला. शाहरुखने आतापर्यंत असंख्य सिनेमांमध्ये काम केलं. त्याच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अभिनेत्याच्या वाट्याला अनेकदा अपयश देखील आलं. पण त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. रोमान्सचा बादशहा असणाऱ्या शाहरुखचे अनेक ॲक्शन सीन देखील प्रेक्षकांना आवडले. पण ॲक्शन सीन करताना अभिनेता जखमी देखील झाला. सेटवर झालेल्या अपघाताबद्दल खुद्द शाहरुख खान याने मोठा खुलासा केला.

‘कोयला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहरुख खान गंभीर जखमी झाला होता. एवढंच नाही तर, अभिनेत्याचा जीव थोडक्यात बचावला होता. सिनेमात एक ॲक्शन सीन करायचा होता. तेव्हा घडलेली घटना खुद्द किंग खान याने सांगितली. शुटिंग दरम्यान अशा दोन घटना घडल्या ज्यामुळे शाहरुख याला स्वतःचे प्राण गमवावे लागले असते. पण थोडक्यात दुर्घटना टळली.

हे सुद्धा वाचाकोयला सिनेमात शाहरुख ‘शंकर’ या भूमिकेत झळकला होता. सिनेमात एका सीनमध्ये शाहरुखला जोरात धावत यायचं होतं आणि हेलीकॉप्टर त्याचा पाठलाग करत येणार होता. सीनमध्ये हेलीकॉप्टर शाहरुख याच्या डोक्यावरुन जाणार होता आणि अभिनेत्याला खाली पडायचं होतं. पण पायलटच्या चुकीमुळे हेलीकॉप्टर शाहरुखच्या अगदी डोक्यावरुन केला. हेलीकॉप्टर डोक्यावरुन गेल्यामुळे किंग खान खरंच खाली पडला आणि या अपघातात अभिनेत्याचा जीव देखील जावू शकला असता.

एवढंच नाही तर, आणखी एक सीन शूट करत असताना अभिनेत्याचा जीव थोडक्यात बचावला. सिनेमात एक सीनमध्ये शरीराला आग लावल्यानंतर किंग खानला जोरात धावायचं होतं. पण सीन करताना अभिनेत्याच्या शरीराला खंरचं आग लागली. तेव्हा शाहरुखने फायरप्रुफ कपडे घातले होते. शिवाय चेहऱ्यावर वॉटर जेल देखील लावलं होतं.

पण सीन करताना अचानक शारुखला खरंच आग लागली. एका मुलाखतीत या प्रसंगाबद्दल अभिनेता म्हणाला, ‘आग विझत नव्हती म्हणून मी जमीनीवर पडलो. प्रत्येक जण आग विझवण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान, एका मुलाला वाटलं की, अभिनेत्याच्या चेहऱ्याला आग लागत आहे. त्यामुळे त्याने किंग खानच्या चेहऱ्यावर कार्बन डाईऑक्सायडची फवारणी केली. तेव्हा शाहरुख खानचा श्वासही काही क्षण थांबला होता. तो काळ अभिनेत्यासाठी खूप भीतीदायक होता.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *