आईच्या हट्टामुळे वयाच्या २२ व्या वर्षी अभिनेत्रीचं लग्न, नाही टिकलं नातं; घटस्पोटानंतर तिचा ‘या’ अभिनेत्यावर जडला जीव – amitabh bachchan real life sister supriya pathak love story with pankaj kapoor

मनोरंजन


अमिताभ बच्चन यांच्या ‘ऑनस्क्रीन बहिणी’च्या आयुष्यात अनेक चढ – उतार, आईने मित्राच्या मुलासोबत ठरवलं अभिनेत्रीचं लग्न पण, नाही टिकलं नातं; घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत तिचं खास कनेक्शन

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे आजही तुफान चर्चेत आहेत. पडद्यामागे सेलिब्रिटींचं आयुष्य कसं असतं.. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. कॅमेऱ्यासमोर उभं राहून कायम चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात देखील अनेक चढ-उतार असतात. बॉलिवूडचा एक काळ असा होता, जो ८० ते ९० च्या दशकातील कोणतीही व्यक्ती विसरू शकत नाही. या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस आले आणि त्यामुळे बॉलिवूडला खरे स्टार मिळाले. बॉलिवूडमध्येच नाही तर, जगभरात आज महानायक अमिताभ बच्चन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. बिग बी यांच्यासोबत ‘शहंशाह’ सिनेमात झळकलेल्या सुप्रिया पाठक यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आहे. सिनेमात सुप्रिया पाठक यांनी बिग बींच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडमध्ये गेल्या ३ दशकांपासून सक्रिय असणाऱ्या सुप्रिया पाठक यांच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आहे. सुप्रिया यांच्या आई दीना पाठक यांनी वयाच्या २२ लेकीचं लग्न मित्राच्या मुलासोबत ठरवलं. पण सुप्रिया यांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने घटस्पोटाचा निर्णय घेत पती पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा



घटस्फोटानंतर सुप्रिया यांनी पूर्ण लक्ष करियरकडे केंद्रीत केलं. पण आयुष्यात कोणत्यातरी मार्गावर आपल्याला स्वतःच्या हक्काचा व्यक्ती भेटतो… असं आपण अनेकदा ऐकतो. असंच काही सुप्रिया यांच्यासोबत देखील झालं. ‘मौसम’ सिनेमाचं शुटिंग सुरु असताना सुप्रिया आणि अभिनेते पंकज कपूर यांची ओळख झाली. सिनेमाच्या सेटवरच त्यांच्या भेटीचं रुंपातर मैत्रीत झालं.

सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांची मैत्री दिवसागणिक अधिक घट्ट होत होती. अखेर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांनी लग्न केलं. सु्प्रिया पाठक यांच्यासोबत पंकज कपूर यांचं दुसरं लग्न आहे. सुप्रिया यांच्यासोबत लग्न करण्याआधी पंकज यांचं लग्न नीलिमा अजीम यांच्यासोबत झालं होतं. (supriya pathak love story with pankaj kapoor)

पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव शाहीद कपूर आहे. शाहीद आज त्याच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. नीलिमा अजीम आणि शाहीद याची मुलगी मिशा यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. महत्त्वाचं म्हणजे शाहीद देखील आई – वडिलांसोबत फोटो पोस्ट करत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *